Pratibimb

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०१०

साडेसाती (शनी महाराजांची वक्रदृष्टी)

साडेसाती
(शनी महाराजांची वक्रदृष्टी)
मी ज्योतिषी नाही. आणि ज्योतिष शास्त्रावर माझा कधी विश्वास हि नव्हता. पण साडेसाती लागल्यापासून थोडी द्विधा मनस्थिती आहे. गेल्या एक वर्षापासून माझे कोणतेही काम पूर्ण होत नाही म्हणून घरातल्या श्रद्धाळू व्यक्तींनी ज्योतिषाला विचारले. तेव्हाच कळले कि माझ्यावर शनी महाराजांची अवकृपा झाली आहे. म्हणजे मला साडेसाती आहे. मग माझेही कुतूहल वाढले आणि त्यासंबधी माहिती मिळवायचे ठरवले. ती अशी.आयुष्यात प्रत्येकाला साडेसाती येतेच, ती कुणालाही टळत नाही. त्या त्या वेळी चंद्र राशी असणार्या राशीत शनी अडीच वर्ष राहत असतो. तीन राशींचे प्रत्येकी अडीच याप्रमाणे साडेसात वर्ष होतात म्हणून त्याला साडेसाती म्हणतात.त्या काळात संबधित व्यक्तीला आर्थिक, सामाजिक, शारीरिक व मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही लोकांच्या मते अशा काळात काही लोकांची भरभराटी होते. आता तुम्हीच सांगा कि हि माझी भरभराटी आहे कि अधोगती ???
. लोक एका दिवसात घर घेऊन मोकळे होतात. मी तीन महिन्यापासून व्यवहार केला आहे पण अजूनही कागदपत्रांची पूर्तता होत नाही. एक अडचण गेली तर पुढची हात जोडून स्वागतासाठी तयार असतेच.

. एका वर्षात ७ ते ८ मोठ्या कंपन्यांसाठी प्लेसमेंट चे क्वाल आले पण मुलाखतीसाठी कुणीही बोलावले नाही.
. मुळव्याध सारख्या दुष्ट आजाराची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.
. प्रत्येक वेळी पैशांच्या अडचणी येतात.
. ज्यांच्या भरवशावर कामे घेतो ते वेळेवरच नकार देतात.
६. एवढेच काय तर कुठल्याही रांगेत ४ तास जरी ऊभा राहिलो तरी जवळ जाताच कौन्तर बंद होते.
७. कितीही बचत केली तरी अनावश्यक खर्च वाढतच जातो.
८. १०० वेळा नकार देऊनही कंपनीने क्रेडीट कार्ड माझ्या गळ्यात मारलेच. आणि त्यावरही असम्बाधित चार्जेस लाऊन मला ते भरण्यास भाग पाडले.
९. मोठ्या मुश्किलीने बँक कर्ज पास झाले आणि लगेचच व्याज दर वाढले.
१०. कितीही प्रयत्न करून मार्केटिंग चे टार्गेट पूर्ण होत नाही.
मी जे करायला नको तेच करावेसे वाटते. आता हेच बघा अशा वेळी आपल्या खाजगी गोष्टी कुणासमोरही बोलू नये असे म्हणतात आणि मी हे काय करतोय ? (माझ्या या वक्तव्यावर तुम्ही हसू किंवा रडू नका नाहीतर अजून एक संधी महाराजांना मिळाली म्हणून समजाच.) अशा अनेक लहान-सहान गोष्टी असतील ज्या मला नेमक्या आत्ताच आठवणार नाहीत.
उपाय म्हणून काही लोक म्हणतात कि शनीचे दर्शन घ्यावे म्हणजे तो खुश होतो तर काहींच्या मते त्याला तोंडच दाखू नये नाहीतर त्याला राग येतो.
आता मला कळाले कि हिंदू धर्मात ३३ कोटी देविदेवता असूनही लोक शनिवारीच मारुतीच्या मंदिरात भली मोठी रांग का लावतात.एवढे घडल्यावर मी या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही तर काय करेन ? विश्वास ठेवावा किंवा ठेवू नये यावर पुराव्यासह ठोसपणे सांगणारा व्यक्ती मला अजूनही भेटला नाही.  आपली मौल्यवान प्रतिक्रिया द्यायला अजिब्बात विसरू नका.

६ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

माणसाचा जन्म घेतल्यावर या अडचणी गृहीत धरायलाच हव्यात. मग तो जन्म तुम्ही स्वताच्या इच्छेने घेतला असो वा नसो. त्यांचा बाऊ करण्यापेक्षा त्यातून मार्ग काढण्यावर भर देणे हा एकच उपाय त्यावर आहे

राजेंद्र अहिरे म्हणाले...

खरे आहे तुमचे म्हणने. साडेसाती असो नाहीतर नसो अडचणी या येणारच.

Shasha म्हणाले...

ज्योतिषविषयक माझा अभ्यास वगैरे आहे अशातला भाग नाही पण मी स्वतः या सर्व गोष्टी मानते. तुमच्या राशीचा तुमच्या स्वभावावर असलेला परिणाम, कुंडली, साडेसाती या गोष्टींमागे काही समीकरणे आहेत, काही तत्वे असतात. ज्योतिषशास्त्र एक शास्त्र आहे. ते अगदी तंतोतंत घेऊन चाललेच पाहिजे असे जरुरी नाही. पण एक मार्ग-दर्शक म्हणून त्याच्याकडे बघावयास हरकत नाही.
साडेसाती म्हणाल तर त्याचे तीन भाग असतात. एक चांगली फळे देतो, एक भाग वाईट फळे भोगायला लावतो. तर एक भाग न्युट्रल. वाईट भागात जेवढी सत्कर्मे करू, तेवढे जास्त चांगले परिणाम अनुभवायास मिळतात असे मी ऐकले आहे.
बाकी हे मानावे कि न- मानावे हा वैयक्तिक प्रश्न आहे.

राजेंद्र अहिरे म्हणाले...

ताई प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.
मी खरच बर्याच दिवसापासून विश्वास ठेवावा कि नको यावर confused होतो. पण आता खात्री पटली आहे. तुम्ही सांगितलेल्या तीन भागांपैकी तो माझ्या बाबतीत वाईट फळे भोगावयास लावणारा आहे असे दिसते.

Unknown म्हणाले...

sade sati madhe maze 3 / 13 wajle hote. Mi appar kastane tyatoon savrlo.

राजेंद्र अहिरे म्हणाले...

भेट दिल्यावाद्दल धन्यवाद मिलिंद भाऊ.